लचक भरल्यावर हे उपचार टाळा | Avoid this treatment on sprain

Sprain-lachak
sprain-lachak


लचक भरल्यावर हे उपचार टाळा 
Avoid this treatment on sprain

लचक भरणे हा प्रकार सर्वांनी अनुभवला असेलच. विशिष्ट हालचाल केल्यामुळे किंवा रात्री झोपेत विशिष्ट हालचालींमुळे लचक भरण्याचे सकाळी लक्षात येते. ही लचक कशी भरते? ( How does this sprain occur ) नेमके कोणते बदल शरीरात झाल्यामुळे लचक भरते? याबाबत प्रस्तुत लेखात थोडक्यात माहिती सादर करण्यात आली आहे. 

लचक भरणे म्हणजे काय? 
What is Sprain?

शरीराचा आधार हा मुख्यत्वे तीन घटकांवर अवलंबून असतो. हे घटक म्हणजे हाडे ( Bones), स्नायू आणि लिगामेन्टस्. ( Muscles and ligaments ) सांध्यांचे काम व्यवस्थितपणे चालण्यासाठी या तिघांमध्ये समन्वय आवश्यक असतो. कारण लिगामेन्टस् सांध्यांमध्ये एका हाडाला दुसर्‍या हाडाशी जोडण्याचे काम करतात. कुठल्याही कारणामुळे सांध्याभोवतालच्या लिगामेन्टस्ला झालेली इजा झाल्यास त्याला लचक भरणे असे म्हणतात. लचक भरण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे होणारी इजा ही अतिशय छोटी, सौम्य ते एक गंभीर इजा अशा प्रकारची असू शकते. 

लचक भरल्यावर हे उपाय टाळा- 
Avoid this treatment on sprain-

लचक भरल्यावर आपल्याकडे अनेक पारंपारिक उपचार किंवा घरेलू उपचार केले जातात. या उपचारांपैकी काही उपचार बिनकामाचे आणि उलट त्रास आणखी वाढविणारे असू शकतात असे नवीन संशोधनानुसार सिद्ध झाले आहे. लचक भरल्यावर आपल्याकडे लगेच लचक भरलेल्या जागी मसाज करण्याचा उपचार केला जातो. परंतु त्या ठिकाणी मसाज करण्याचा काहीही उपयोग होत नाही. याउलट त्याचा त्रासच होऊ शकतो. कारण मसाज करण्यामुळे दुखावलेल्या भागाचा रक्तपुरवठा वाढतो आणि सांध्यांमध्ये अधिक पाणी साठत जाते. यामुळे पुढे इजा झालेला भाग सभोवतालच्या चांगल्या भागाला चिकटला जाऊ शकतो.

मसाजप्रमाणे गरम पाण्याने शेकल्यावरही विपरित परिणाम होऊ शकतो. आपल्याकडे अशाप्रकारची इजा झाल्यास लगेच गरम पाण्याने किंवा गरम फडक्याने शेकण्याची प्रथा अनेक ठिकांणी दिसून येते. परंतु लचक भरल्यावर अशा प्रकारच्या शेकण्याचा काहीही उपयोग होत नाही. तसेच त्या भागाला जर उपचार म्हणून व्यायाम देत असाल तर ते पूर्णपणे चुकीचे ठरेल. याशिवाय लचक भरलेल्या जागी तेलाने किंवा क्रीमने चोळणेही चुकीचेच ठरते. यामुळे मसाज केल्याप्रमाणे क्रिया होते आणि त्याचा वर सांगितल्याप्रमाणे वाईटच परिणाम होतो. 

लचक भरल्यावर उपाय- 
Treatment on sprain-

खरे तर लचक भरल्यावर सर्वात प्रथम उपचार म्हणजे दुखावलेल्या भागाला पूर्ण विश्रांती देणे हा होय. तसेच वेदना आणि सूज ( Pain and swelling ) कमी होईपर्यंत या भागाला आराम आणि आधार दिला पाहिजे. तसेच काहीतरी घरगुती उपाय करायचाच असल्यास अशा वेळी गरम पाण्याने शेकण्यापेक्षा बर्फ लावल्यास अधिक फायदेशीर ठरते. लचक भरण्याचे अनेक प्रकार आपोआप काही वेळाने बरे होतात. मात्र लचक भरण्याचा प्रकार हा तीव्र स्वरूपाचा असल्यास आणि त्यामुळे तुमच्या सामान्य हालचालींवर बर्‍यापैकी मर्यादा येत असल्यास अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. तसेच काही व्यक्तींमध्ये लचक भरण्याचा त्रास वारंवार होत असतो, यावर सुद्धा उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे.

टीप- लचक भरल्यानंतर संबंधित भागाला मुंग्या येत असतील आणि त्या अवयवाची ताकद कमी झाली असे वाटत असेल तर अशा स्थितीत त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Note- Image by LillyCantabile from Pixabay 

-------------------------------
लचक भरल्यावर हे उपचार साहित्य अमेझॉन वर उपलब्ध आहे 
This treatment material is available on Amazon on sprain

++++++Amazon_Sprain


फेसबूक, ट्विटर, वॉटस्‌अप इ. खालील आयकॉनवर क्लिक करून हा लेख आपल्या परिचित व्यक्तिंना शेअर करा. तसेच त्याखाली असलेल्या पोस्ट अ कमेंट या ठिकाणी या लेखाबद्दल आपले मत इंग्रजी किंवा मराठीत व्यक्त करा. काही प्रश्न असल्यासही तेथे पोस्ट करा. आपणास प्राप्त झालेली किंवा वरील यूआरएल एड्रेसबार येथील लिंक आपण शेअर करू शकता. असे केल्याने आम्हाला अशाच प्रकारे उत्तम लेख आपल्यासाठी सादर करण्यास प्रेरणा मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या