मास्क वापरायचा की नाही? | Whether to use a mask

 

wearing-mask
wearing-mask

मास्क वापरायचा की नाही?

 Whether to use a mask

वॉटस् अप, फेसबूक आणि गूगलवर माहितीचा शोध घेऊन अजुनही अनेक लोक संभ्रमात आहेत की या कोरोना काळात मास्क लावायचा की नाही?

मास्क लावण्याबाबत असणारे गैरसमज

Misconceptions about wearing a mask

मास्क लावण्याबाबत अनेकांनी बरेच गैरसमज धारण केलेले आहेत,

गैरसमज-१: 
जसे की जे लोक ( डॉक्टर, कपौंडर, नर्स्, इ. ) दवाखान्यात म्हणजेच हॉस्पीटलमध्ये काम करतात, त्यांनीच मास्क वापरायचे.

गैरसमज-२:- 
मास्क विकणार्‍या लोकांची लॉबी आहे, त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी ती लॉबी काम करते.

गैरसमज-३ :
 मला काहीही झालेले नाही, मी मास्क का लावू?

गैरसमज-४ : 
मास्क लावल्याने मला ऑक्सीजन कमी मिळेल.

गैरसमज-५ :- 
मास्कमध्ये हवा ये-जा करण्यासाठी जी छिद्र असतात त्यांच्यातून कोरोना व्हायरस पास होऊ शकतो, मग मास्क का लावायचा?

असे अनेक गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत आणि त्यात नवनवीन कारणांची भर पडत आहे. प्रस्तुत लेखात हे सर्व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बरे असे गैरसमज आपल्या देशातच आहे, असे नव्हे. अनेक देशांमध्ये मास्क लावण्याबाबत संभ्रम आहे. काही देशांमध्ये यावर संशोधनही करण्यात आले. त्या संशोधनाचे निष्कर्ष आणि उपलब्ध सामान्य तर्क याआधारे एकच अर्थ निघतो की मास्क लावायलाच हवा.


मास्क वापरणे गरजेचेच आहे

It is necessary to use a mask


आजारी व्यक्ती आणि मास्क-Sick person and mask-

समजा एखादा व्यक्ती कोरोना संक्रमित आहे आणि त्याला लक्षणे दिसली तर तो उपचार घेईल आणि क्वारंन्टाईन quarantine होईल. पण त्या व्यक्तीत कोणतही लक्षणे दिसली नाही तर तो बाहेर फिरेल किंवा लोकांमध्ये मिसळेल, मात्र अशा व्यक्तीने नियमीतपणे मास्क वापरला तर त्यापासून इतरांना होणारे संक्रमण फार कमी होईल. पण त्याने जर मास्क नाही वापरला तर तो अनेक जणांना संक्रमित करू शकतो.

निरोगी व्यक्ती आणि मास्क- Healthy person and mask-


मी निरोगी आहे, माझ्यात कोणतेही कोरोना व्हायरसची लक्षणे नाहीत, मग मी मास्क का वापरायचा? असा प्रश्‍न अनेक लोकांच्या मनात येतो. पण निरोगी व्यक्तींनी पण मास्क वापरायलाच हवा, कारण त्यांना कोरोना संक्रमित असणार्‍या लोकांपासून कोरोना होण्याची शक्यता कमी कमी होत जाईल. 

मास्कचे छिद्र आणि कोरोना व्हायरसची साईज

The size of the mask pores and the corona virus-

मास्कमध्ये हवा ये-जा करण्यासाठी जी छिद्र असतात त्यांच्यातून कोरोना व्हायरस पास होऊ शकतो, मग मास्क का लावायचा? असा तर्क अनेक जण लावतात. खरे तर कोरोना संक्रमित व्यक्तीपासून खोकल्यावर किंवा शिंकल्यावर किंवा इतर मार्गे व्हायरस ड्रॉपलेटमधून बाहेर पडतो. हे ड्रॉपलेटस् मास्कच्या छिद्रांमध्ये अडकतात. जास्त दूर जात नाहीत. त्यामुळे व्हायरस पसरण्याचा व्हायरस लोड viral load कमी होतो.

कोणता मास्क वापरायचा? 

Which mask to use?


एन-९५ मास्क - N 95 Mask किंवा सर्जीकल मास्क  Surjical Mask प्रत्येकाने त्याच्या ऐपतीनुसार वापरायला हरकत नाही. पण केवळ अशा मास्कनेच कोरोनापासून संरक्षण मिळते असे नाही. घरी बनविलेल्या मास्क मध्ये पण कोरोना व्हायरसचे ड्रॉपलेट अडकले जातात आणि संक्रमणाबाबतचा व्हायरस लोड कमी होतो. पण घरी बनविलेले मास्क हे ३ ते ५ पदरी कापडाचे हवे आणि ते मास्क म्हणून बनविलेले हवेत. म्हणजे त्याने नाक आणि तोंड व्यवस्थित झाकले जाईल. अशा घरी बनविलेल्या मास्क मुळे पण इतरांपासून आपल्याकडे येणारा किंवा रोगी व्यक्तीपासून इतरांकडे जाणारा व्हायरस लोड कमी होतो.

मास्कचे व्यवस्थापन

Mask management

  • घरी बनविलेला कापडी मास्क दररोज धुणे गरजेचे आहे.
  • एकमेकांचे मास्क अजिबात वापरू नये.
  • मास्क एकाच बाजूने लावा.म्हणजे नाकाकडे असलेला भाग प्रत्येकवेळी नाकाकडेच असायला हवा.
  • बाजारातील मास्क त्या त्या कंपनीच्या सुचनेनुसार वापरा. बाजारातील काही मास्क यूज ऍण्ड थ्रो Use and throw प्रकारचे असतात तर काही मास्क धुवून washable पुन्हा वापरता येतात.
  • मास्क लावल्यावर त्याला हात लावू नका. हे टाळण्यासाठी चेहर्‍यावर विशिष्ट प्रकारचे पारदर्शक स्क्रीन आता बाजारात उपलब्ध झाले आहेत.
  • मास्क जसा लावायचा असतो तसाच लावा, अनेक लोक नियमांच्या भितीमुळे मास्क लावतात आणि नाक उघडेच ठेवतात किंवा मास्क गळ्यावर ढकलून ठेवतात. असे अजिबात करू नका.
  • केवळ मास्क म्हणून बनविलेला प्रकारच परिधान करा. काहीतरी गुंडाळायचे म्हणून रूमाल, टॉवेल नाका-तोंडावर गुंडाळू नका. त्याचीवरची बाजू कोणती, खालची कोणती हे उमजत नाही.


मला कोरोना होऊन गेला आता मास्क का लावायचा?

I was cured of Corona Why wear a mask now?


एकदा कोरोना होऊन बरा झालेला पेशंट नेहमी म्हणतो की आता मला पुन्हा कोरोना होणार नाही, मी बाहेर फिरायला मोकळा. पण यावर निश्‍चित असे संशोधन व्हायचे बाकी आहे. ज्यांना कोरानो होऊन गेला, अशा लोकांनी पण मास्क लावणे गरजेचे आहे. कारण कोरोना मध्ये काही प्रमाणात आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. म्हणून मास्क लावूनच बाहेर जाणे योग्य आहे. कारण सध्या पावसाळा आणि हिवाळ्याचे दिवस आहेत. मग अशा व्यक्तींना इतर रोगांचे संक्रमण होऊ नये म्हणून मास्क लावायलाच हवा.

खूप वेळ मास्क लावायचा का? 

Want to wear a mask for a long time?


खूप वेळ मास्क लावल्याने मला ऑक्सीजन कमी मिळेल, असा तर्क अनेक लोक लावत असतात. परंतु यात अर्थ नाही. आपण गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यालयात काम करत असाल तर मास्क लावायलाच हवा. खूप वेळ मास्क लावायचा असेल तर चांगल्या दर्जाचा आणि योग्य आकाराचा मास्क परिधान करायचा. म्हणजे जास्त वेळ लावल्याने नाकाला त्रास होणार नाही. मास्क लावून आपण सामान्य काम करत असाल तर आपल्या ऑक्सीजन इन्टेकवर Oxygen Intake काहीही परिणाम होणार नाही. अगदी आपण मास्क लावून डोंगर चढत असाल तर काळजी घ्यावी लागेल. जीना चढतांना हळूहळू चढावा.

व्हायरल लोड म्हणजे काय? 

What is viral load?

मलेरीयाचा डास चावल्याबरोबर त्या व्यक्तीला लगेच मलेरिया होत नाही. खूप वेळा तो मलेरीयाचा डास चावल्यावर मलेरीया होण्याची शक्यता वाढते. म्हणजेच मलेरीया व्हायरसचा डोस आपल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या वर जातो. म्हणून मलेररीयाचा डास खूप वेळा चावला तरच मलेरीया होतो. तसेच काम कोरोना संक्रमणात मास्क करतो. म्हणजेच आजारी व्यक्ती किंवा कोरोना संक्रमित व्यक्ती मास्क लावूनच बाहेर पडला तर त्यापासून पसरणारे संक्रमण म्हणजेच व्हायरललोड फार कमी राहील.

सारांश-

रोगी आणि निरोगी व्यक्ती असे सर्वांनी मास्क लावला तर हवेत पसरणारे कोरोना व्हायरसचे संक्रमण कमी होईल, म्हणजेच हवेतील व्हायरस लोड कमी होईल. त्यामुळे डॉक्टर आणि हॉस्पीटल यांच्यावर पडणारा त्राणही कमी होईल. सर्वांनी जर योग्य प्रकारे मास्क वापरले तर कम्युनिटी स्प्रेडची ( समूह संक्रमण) वेळ येणार नाही.

.................................................................. 

( Click here to purchase a mask from Amazon)

Amazon-mask

...................................................................

खालील फेसबूक, ट्विटर, वॉटस्‌अप इ. आयकॉनवर क्लिक करून हा लेख आपल्या परिचित व्यक्तिंना शेअर करा. तसेच त्याखाली असलेल्या पोस्ट अ कमेंट या ठिकाणी या लेखाबद्दल आपले मत इंग्रजी किंवा मराठीत व्यक्त करा. काही प्रश्‍न असल्यासही तेथे पोस्ट करा. आपणास प्राप्त झालेली किंवा वरील यूआरएल एड्रेसबार येथील लिंक आपण शेअर करू शकता. असे केल्याने आम्हाला अशाच प्रकारे उत्तम लेख आपल्यासाठी सादर करण्यास प्रेरणा मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या