गुणकारी चिंचोका | Tamarind


tamarind
tamarind

गुणकारी चिंचोका | Tamarind


चिंचेच्या फळाच्या आतील बी. ही साधारणतः द्विदल व चौकोनी असते. याचे बाह्यावरण लालसर कथ्थ्या रंगाचे असते. दोन शकले केली असता आतील भाग हलक्या पिवळसर किंवा पांढरट रंगाचा असतो. या बीला चिंचोका असे म्हणतात. चिंच खाल्ल्यावर या बी चा उपयोग दोन तुकडे करून चौपट खेळण्याकरिता पूर्वी होत होतो. मात्र हाच चिंचोका आयुर्वेदाच्या दृष्टीने एक उत्तम औषध आहे. 

चिंचोका हा कषाय म्हणजे म्हणजेच तुरट रसाचा असल्याने तो स्तंभक आहे. याने आतड्यांच्या हालचाली मंदावतात. साहजिकच अन्न पुढेमागे नेण्याची प्रक्रियाही मंदावते. आतड्यांतील द्रवभागाचे शोषण होण्यास पुष्कळ कालावधी उपलब्ध होतो. चिंचोकाच्या या गुणामुळे त्याला जुलाबावरील एक उत्तम औषध समजले जाते. विशेषत: लहान मुलांना जुलाब होत असतांना चिंचोका पाण्यात उगाळून तयार गंध वापरणे इष्ट असते. 

तुरट रसाची सर्वच द्रव्ये मधुमेही - diebetic रूग्णात साखर कमी करण्यास उपयुक्त ठरतात. चिंचोका एक उत्तम तुरट रसाचे द्रव्य असल्याने मधुमेहामध्ये उपयोगी ठरते. मधुमेहावर वापरल्या जाणार्‍या अन्य औषधांना भाजलेल्या चिंचोक्याची अर्धा चमचा प्रत्येक वेळी जोड दिल्यास मूळ औषधांचे गुणधर्म अनेक पटींनी वाढतात.


 चिंचोक्याचे पीठ शिजवून ते गरम असताना त्याचा पोटीस म्हणून वापर होतो. चिंचोक्याचे चूर्ण पाण्याबरोबर खोकल्याचे औषध म्हणून सेवन करतात. हेच पाणी तोंडात धरून ठेवल्यास शिथिल झालेली उपजिव्हा ठीक होते.

भोजनानंतर मुखशुध्दीसाठी चिंचोका वापरतात.  भाजलेल्या चिंचोक्याची टरफले काढून सुपारीसारखे चुर्ण किंवा तुकडे, भाजलेल्या खारकांचे तुकडे तसेच मीठ व लिंबयुक्त ओवा टाकतात. ही सुपारी चवदार व पाचक असते. चिंचोके वातहरक रक्तदोषनिवारक व कफनाशक असतात. साल काढलेल्या, भाजलेल्या चिंचोक्याचं चूर्णीचे मध व तुपातून चाटण केल्यास कफ व कफाबरोबर रक्त पडणाचे थांबते. पडजीभ आल्यास चिंचोका थंड पाण्यात उगाळून त्याचा लेप करतात. चिंचोका चूर्ण व हळद थंडपाण्यात मिसळून घेतल्यास गोवर व कांजिण्यात आराम पडतो. चिंचोके कुटून व यंत्रदाबानं चिंचोक्याचं तेल काढतात. ते शक्तीवर्धक असतं. 

....................................
खालील फेसबूक, ट्विटर, वॉटस्‌अप इ. आयकॉनवर क्लिक करून हा लेख आपल्या परिचित व्यक्तिंना शेअर करा. तसेच त्याखाली असलेल्या पोस्ट अ कमेंट या ठिकाणी या लेखाबद्दल आपले मत इंग्रजी किंवा मराठीत व्यक्त करा. काही प्रश्‍न असल्यासही तेथे पोस्ट करा. आपणास प्राप्त झालेली किंवा वरील यूआरएल एड्रेसबार येथील लिंक आपण शेअर करू शकता. असे केल्याने आम्हाला अशाच प्रकारे उत्तम लेख आपल्यासाठी सादर करण्यास प्रेरणा मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या