भाताच्या कोंड्यापासून राईस ब्रॅन ऑईल | Rice Bran Oil

rice-bran-oil
rice-bran-oil

भाताच्या कोंड्यापासून राईस ब्रॅन ऑईल 

Rice Bran Oil 

भारतात भूईमूग, सोयाबीन, मोहरी आणि खोबरेल तेलाचे सेवन सर्वश्रूत आहे. या तेलांचे आरोग्याच्या दृष्टीने कमी-अधिक फायदे आहेत. आतापर्यंत खाद्यतेलाची निवड त्यांच्या किंमतीवर केली जायची, 

परंतु हदयरोग्यांची वाढती संख्या लक्षात घेता  ग्राहक आता खाद्यतेल निवडीबाबत चोखंदळ झाले आहेत. नवीन संशोधनानुसार सर्वाधिक निरोगी आणि ह्दयाच्या आरोग्याला उपयुक्त खाद्य तेल म्हणून राइस ब्रॅन ऑईल ओळखले जाते. हे तेल भाताच्या कोंड्यापासून तयार केले जाते. 

अमेरिकेत तसेच अनेक आशियाई देशांमध्ये निरोगी तेल म्हणून राईस ब्रॅन विकले जाते. कोलेस्टेरॉलची पातळी योग्य तितकी राखण्यासाठी आणि ह्दयविकार व अन्य आजार रोखण्यासाठी या खाद्यतेलाचा वापर जागतिक आरोग्य संघटनेनेही सुचविला आहे.

आरोग्यविषयक वाढत्या जागरूकतेने लोक ऑलिव्ह ऑईल आणि कॅनोला तेलाला पसंती देतांना दिसतात. परंतु या महागड्या आणि आयात होणार्‍या आलिव्ह आणि कॅनोला ऑइलला किफायती भारतीय पर्याय म्हणून राईस ब्रॅन ऑइल हळूहळू लोकांच्या पसंतीस उतरत आहे. भाताच्या उत्पादनात जगात चीननंतर दुसरा मोठा देश भारत जरी असला तरी सध्या देशात सुमारे १० लाख टन इतकेच राईस ब्रॅन तेल उत्पादित होते. तर भारतातील वार्षिक खाद्यतेलाचा उपभोग हा १ कोटी २० लाख टन असून, त्या तुलनेत उत्पादित राईस ब्रॅन तेलाचे प्रमाण जेमतेम ५ टक्के आहे. भारतात भाताच्या कोंड्यांची प्रचंड उपलब्धता असली तरी हा भात कोंडा वीट भट्‌ट्यांमध्ये जळणासाठी आणि पशुखाद्य म्हणूनच वाया घालविला जातो. तथापि, भारतात सध्या १५ लाख टन राईस ब्रॅन तेल बनविण्याची कमाल क्षमता आहे. या कमाल क्षमतेने जरी उत्पादन घ्यावयाचे झाले तरी एकूण मागणीच्या १२ टक्केच गरज भागविली जाऊ शकते. सध्या भारतात खाद्य तेलाच्या आयातीसाठी बहुमोल विदेशी चलन खर्ची होते. म्हणून सरकारने या भात कोंड्याच्या तेलाला प्रोत्साहन दिल्यास करोडो रूपयांचे विदेशी चलन वाचविले जाऊ शकते. सध्या देशात अदानी विल्मर, मॅरिको, राईसेला यासह विविध नऊ उत्पादकांचे राईस ब्रॅन तेलाचे ब्रॅण्डस् बाजारात उपलब्ध आहेत. हे तेल आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त तर आहेच, त्यासोबत स्वयंपाकाच्या दृष्टीनेही उपयुक्त आहे. कारण २१७ अंश सेल्सियस तापमानापर्यंत तापलेल्या राईस ब्रॅन तेलात नैसर्गिक पोषणमूल्ये आणि अँटि-ऑक्सिडंटसचे प्रमाण अबाधित राहते.त्यामुळे या तेलासोबत प्रक्रियाकरून तयार होणार्‍या पदार्थांमध्ये पोषणमूल्य कायम राहतात. 

======================

हेही वाचलंत का?


======================
आणखी महत्त्वाचे लेख 
खालील फेसबूक, ट्विटर, वॉटस्‌अप इ. आयकॉनवर क्लिक करून हा लेख आपल्या परिचित व्यक्तिंना शेअर करा. तसेच त्याखाली असलेल्या पोस्ट अ कमेंट या ठिकाणी या लेखाबद्दल आपले मत इंग्रजी किंवा मराठीत व्यक्त करा. काही प्रश्‍न असल्यासही तेथे पोस्ट करा. आपणास प्राप्त झालेली किंवा वरील यूआरएल एड्रेसबार येथील लिंक आपण शेअर करू शकता. असे केल्याने आम्हाला अशाच प्रकारे उत्तम लेख आपल्यासाठी सादर करण्यास प्रेरणा मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या