कोरोना पासून बचावासाठी पल्स ऑक्सिमीटर | Pulse oximeter for protection from corona

pulse-oximeter
pulse-oximeter

कोरोना पासून बचावासाठी पल्स ऑक्सिमीटर
Pulse oximeter for protection from corona

कोरोनामुळे लॉकडाऊन आणि नंतर अनलॉक सुरू झाल्यापासून सर्वात प्रथम सॅनिटायझरला सर्वातजास्त प्रसिद्धी मिळाली. क्रमांक दोनवर प्रसिद्धी मिळवणार्‍या वस्तूचे नाव आहे-पल्स ऑक्सिमीटर. करोनापासून सावधान करणारे पल्स ऑक्सिमीटर म्हणजे नक्की आहे तरी काय? ते कसे उपयुक्त आहे? त्याची किंमत किती? वापरायचे कसे? आणि हे डिव्हाईस आपला करोनापासून बचाव करण्यास कशी मदत करेल? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे प्रस्तुत लेखात सादर केली आहेत.
(What exactly is a pulse oximeter that warns of corona? How useful is a pulse oximeter? How much it cost? How to use it? Will this device protect from Corona?)

पल्स ऑक्सिमीटर डिव्हाईस अस असत 
Pulse oximeter device

शरीरातील ऑक्सिजनची पातळी व हृदयाचे ठोके मोजण्यासाठी वापरण्यात येणारे पल्स ऑक्सिमीटर हे वैद्यकीय उपकरण आहे. हे एका छोट्या क्लिपसारख डिव्हाईस आहे. खरे तर पल्स ऑक्सिमीटर ही ऑक्सिजनची मात्रा ( ब्लड ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल- एसपीओटू - Blood Oxygen saturation level- % SpO2 ) मापण्याची एक प्रकारची चाचणी असते. पल्स ऑक्सिमीटर मध्ये आपलं बोट ठेवायच आणि त्यानंतर लगेचच त्यावर काही क्रमांक दाखवले जातात. या चाचणीमध्ये रुग्णाला कोणतीही दुखापत किंवा वेदना होत नाहीत. हे उपकरण आपल्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा मापण्यास मदत करते. या उपकरणामधील सेन्सर रक्तामधील ऑक्सिजनच्या प्रमाणामध्ये काहीही बदल झाल्यास तसे रिडिंग दर्शवितो. ते आपल्या ह्रदयाच्या ठोक्यांचे रिडींग देखील देते.

आपल ह्रदय चांगल्या प्रकारे काम करतय की नाही याची माहिती पल्स ऑक्सिमीटरद्वारे आपल्याला समजू शकते. ह्रदय आपल्या संपूर्ण शरीरात रक्त पुरवठ्याचे कार्य करते. त्यामुळे पल्स ऑक्सिमीटरच्या मदतीने ह्रदयाचं कार्य किती व्यवस्थित सुरु आहे हे समजतं. तसेच फुफ्फुसासाठी दिलेलं औषध किती चांगल्या पद्धतीने काम करतंय हे समजण्यासोबतच कोणाला श्वास घेण्यास अडथळा येत असल्यास ते देखील समजते.

किती आली पाहिजे रिडींग? 
What readings should be there?

साधारणपणे आपल्या रक्तात ८९-९० टक्के पेक्षा अधिक ऑक्सिजन असणे आवश्यक असते. कारण इतका ऑक्सिजन शरीरात असल्याने आपले शरीर आणि सेल्स तंदुरुस्त राहतात. जर काही काळासाठी याची टक्केवारी तुमच्या शरीरात कमी झाली तरी तो चिंतेचा विषय नाही. पण बर्‍याच काळासाठी ही टक्केवारी कमी होणे चिंतेची बाब आहे. पल्स ऑक्सिमीटर काही सेकंदांत रक्तातील ऑक्सिजनची पातळी व हृदयाचे ठोके दर्शविते. निरोगी लोकांची ऑक्सिजन पातळी ९५% ते ९८% दर्शवते. करोना संशयित किंवा श्‍वासासबंधी आजारी व्यक्तींमध्ये ती पातळी ९२% किंवा त्यापेक्षा कमी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. ही पातळी ९०% च्या खाली गेल्यास ताबडतोब रुग्णालयात जायला हवे. सामान्य व्यक्तीच्या हृदयाचे ठोके मिनिटाला ६० ते १०० असतात.

कोरोना आणि पल्स ऑक्सिमीटर 
Corona and Pulse Oximeter

शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होणे कोरोना संसर्गाचे सुरुवातीचे लक्षण आहे. पल्स ऑक्सिमीटर आपल्यासोबत असेल तर ही पातळी आपण घरीच तपासू शकतो. याशिवाय पल्स ऑक्सिमीटरचे खालील फायदे आहेत.

* कोरोनामध्ये श्वास घेण्याचा त्रास सुरु होण्याआधी कमी झालेल्या ऑक्सिजनच्या पातळीवरून न्यूमोनिया ( Pneumonia) किंवा ऑक्सिजन कमी करणार्‍या इतर घटकांच्या गुंतागुंतीचे निदान करता येते.

(साधारण ऑक्सिजनची पातळी सहसा ९४-१०० ही नॉर्मल असते. डॉक्टरांच्या सल्यानुसार औषधे सुरू असतील आणि आपण डॉक्टरांच्या संपर्कात असाल तर ही पातळी ९३ पर्यंतही चालते. पण ९० च्या खाली मात्र तातडीने हॉस्पीटलमध्ये जायला हवे.)

* होम आयसोलेशनमधील ( Home isolation ) व्यक्तीला स्वत:च्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घरच्या घरी मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरचा उपयोग होऊ शकतो.

* लक्षणविरहीत asymptomatic 
तसेच सौम्य व मध्यम लक्षणे असणार्‍या होम आयसोलेशनमधील व्यक्तीला स्वत:च्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घरच्या घरी मोजण्यासाठीही पल्स ऑक्सिमीटरचा उपयोग होऊ शकतो.

* शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होणे कोरोना संसर्गाचे सुरुवातीचे लक्षण आहे. पल्स ऑक्सिमीटर ही पातळी तपासतो. काही व्यक्तींमध्ये ताप व खोकल्यासारखी लक्षणे ( fever and cold symptoms) 
दिसण्याच्या आधी या पातळीवरून कोरोनाचे संकेत आपल्याला समजू शकतात, त्यामुळे लवकरात लवकर उपचार सुरू करता येऊन पुढील गुंतागुंत टाळता येते.

* ज्या व्यक्तिंवर कोराना आणि ऑक्सिजन कमी झाल्यामुळे उपचार सुरू आहेत, असे व्यक्ती औषध-उपचारांमुळे आपली आक्सिजनची पातळी वाढते आहे की नाही हे तपासू शकता.

( Click image to purchase Oximeter from Amazon)


रीडिंग कशी बघावी?
How to view readings?

पल्स ऑक्सिमीटर ऑक्सिजनची पातळी आणि हृदयाचे ठोके अशा दोन्ही रीडिंग दाखवते. ऑक्सिजन दाखवले जाते तिथे % एसपीओटू असे लिहिलेले असते. सहसा वर दाखवलेली रीडिंग किंवा सुरूवातीला दाखविलेले रिडिंग ऑक्सिजनची असते आणि खाली दाखवलेली हृदयाच्या ठोक्याची असते. काही पल्स ऑक्सिमीटर मध्ये हे उलटे असू शकते व कुठली पातळी कशाची आहे हे मशिनच्या कव्हरवर लिहिलेले असते. रीडिंग दाखवण्यासाठी किमान ३० सेकंद लागतात. वेगवेगळ्या कंपन्यांच्या पल्स ऑक्सिमीटरमध्ये ही वेळ वेगळी असू शकते. पल्स ऑक्सिमीटर लावण्याआधी बोटे तळहातावर चोळून गरम करून घ्यावे.

ऑक्सिजनची पातळी कमी दिसली तर -
If the oxygen level appears low-

पल्स ऑक्सिमीटर ऑक्सिजनची पातळी कमी दाखवत असेल तर एकदम घाबरून जाऊ नका. अनेक ऑक्सिमीटरमध्ये रिडिंग धोक्याच्या पातळीवर गेले तर रिडिंग ब्लिंक होऊन सिग्नल दिला जातो, अशावेळी घाबरू नका. खालील मुद्दे लक्षात घ्या आणि पुन्हा तपासा. कारण ऑक्सिजनची पातळी कमी दाखवली तरी दर वेळी ती बरोबर असेल असे नाही.

व्यक्ती नॉर्मल, स्वस्थ असताना ही पातळी कमी दाखवण्याची पुढील कारणे असू शकतात

  • -मशिन बोटाला नीट लावलेले नसेल.
  • -हाताला मेंदी / नखाला नेल पॉलिश लावलेले असेल.
  • -हात थंड असतील.
  • -शरीरात लिपिड - चरबीचे प्रमाण जास्त असणे.
  • -नख मोठे असल्याने पल्स ऑक्सिमीटर बोटावर नीट न बसणेे
  • -खोलीतील जास्त प्रमाणात असलेला प्रकाश / सूर्यप्रकाश पल्स ऑक्सिमीटरच्या लाईटशी ढवळाढवळ करत असणे. 
म्हणून ऑक्सिजन कमी दाखवले तर लगेच घाबरून जाऊ नये. मशिन योग्यरित्या काम करते आहे का हे तपासा, वरील मुद्दे विचारात घ्या आणि पुन्हा रिडिंग घ्या. तरीसुद्धा रिडिंग कमी येत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अतिशय महत्त्वाचे -
Very Important - 

 जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण हे ९५ ते १०० दरम्यान असेल तर ते साधारण मानलं जात. मात्र जर एखाद्याच्या शरीरात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण हे ९४ किंवा त्याहून कमी असेल तर त्याला संशयित समजल जात. ज्या व्यक्तींना अन्य आजार आहेत आणि त्यांच्यात ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी दिसून येते.

याचा अर्थ नीट समजून घ्या. म्हणजे ऑक्सिजनचे प्रमाण जर कमी होत असेल तर निश्‍चितच तो व्यक्ती कोरोना संशयित समजावा, मात्र केवळ कोरोनामुळेच ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते असे नसून इतर आजारांनीसुद्धा हे प्रमाण कमी होते. जसे की क्रोनिक ऑब्सट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीस, दमा, न्यूमोनिया, फुफ्फुसांचा कर्करोग, अशक्तपणा, ऍनिमीया, हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट फेल ( Chronic Obstructive Pulmonary Disease, Asthma, Pneumonia, Lung Cancer, Weakness, Anemia, Heart Attack Or Heart Failure ) यासारख्या गंभीर समस्यांसाठी देखील आक्सिजनची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी म्हणजे कोरोनाच आहे असा निष्कर्ष लगेच काढू नका, मात्र लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच ऑक्सिजनची पातळी सामान्य असेल आणि इतर लक्षणे दिसत असतील तरीही डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण अनेक कोरोनाबाधित रूग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी सुरूवातीच्या स्तरात सामान्य राहते आणि अशावेळी त्यांना उपचार मिळाले तर त्यांची पातळी कमी न होता ते बरे होतात.

(Amazonवरून ऑक्सिमीटर खरेदी करण्यासाठी image वर क्लिक करा)
covid-oximeter
Pulse Oximeter

प्रत्येक घरात पल्स ऑक्सिमीटर असावे का?
Should every home have a pulse oximeter?

ज्यांना पल्स ऑक्सिमीटरची किंमत माहीत नाही, त्यांच्या मनात हा प्रश्‍न येईल. या लेखाच्या सर्वात शेवटी पल्स ऑक्सिमीटरची किंमत दिली आहे आणि ते कसे विकत घ्यावे याबाबत ऍमेझॉनची लिंकपण दिली आहे. पल्स ऑक्सिमीटरची किंमत कळाल्यावर आपल्या मनात नक्कीच विचार येईल की हे उपकरण प्रत्येकाच्या घरात असणे सहज शक्य आहे. अगदी सुरूवातीला या पल्स ऑक्सिमीटरच्या रिडिंगद्वारे कोरोचे लक्षण किंवा न्युमोनियाचे लक्षण किंवा श्‍वासासबंधी आजाराचे लक्षण कळाले तर त्वरीत उपचार सुरू करता येऊ शकतात.
एक मुद्दा येथे आवर्जून सांगावासा वाटतो की एकापेक्षा जास्त जण पल्स ऑक्सिमीटर वापरणार असतील तर प्रत्येक वेळी ते सॅनिटायजरने योग्य ती काळजी घेऊन क्लीन करून घ्यावे.

------------------------------------------

खालील फेसबूक, ट्विटर, वॉटस्‌अप इ. आयकॉनवर क्लिक करून हा लेख आपल्या परिचित व्यक्तिंना शेअर करा. तसेच त्याखाली असलेल्या पोस्ट अ कमेंट या ठिकाणी या लेखाबद्दल आपले मत इंग्रजी किंवा मराठीत व्यक्त करा. काही प्रश्‍न असल्यासही तेथे पोस्ट करा. आपणास प्राप्त झालेली किंवा वरील यूआरएल एड्रेसबार येथील लिंक आपण शेअर करू शकता. असे केल्याने आम्हाला अशाच प्रकारे उत्तम लेख आपल्यासाठी सादर करण्यास प्रेरणा मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या