पॅक दुधाचे प्रकार | Packed Milk

packed-milk
packed-milkपॅक दुधाचे प्रकार | Packed Milk


रोज एक कप दूध घ्या किंवा मलईविरहीत दूध घ्या असा सल्ला डॉक्टर नेहमी देत असतात. तसेच मोठ्या शहरांमध्ये पॅक दूध मिळते. असे दूध विकत घेतल्यावर अनेक वेळा त्यावर घट्ट मलई येते किंवा काही वेळा येत नाही. 
अशा वेळी दूधात पाण्याची भेसळ केली म्हणून आपण कंपनीला नावे ठेवतो. परंतु कंपनीची त्यात काहीही चूक नसते. 

पॅक दुधावर जसे लेबल असते, त्याच प्रकारचे दूध त्यात असते. परंतु अशा लेबलचा अर्थ काय असतो, हे आपण जाणून घेणे महत्त्वाचे असते. म्हणजे आपणाला हवे तसे दूध विकत घेता येईल. 

 

म्हणजेच जर डॉक्टरांनी सांगितले की मलईविरहीत दूध घ्या, अशा वेळी महागडे दूध आणून ते तापवून त्यावरील मलई काढण्यापेक्षा स्वस्तात मिळणारे डबल टोण्ड दूध आपली गरज भागवू शकेल. त्यासाठी खाली नमूद केलेल्या दुधाच्या संज्ञा माहीत करून घेणे गरजेचे आहे.

प्रमाणीकृत दूध-Standardised Milk


ज्या दुधामधील स्निग्धांश आणि स्निग्धेत्तर घनपदार्थ यांचे प्रमाण आधीच ठरविलेल्या स्तरानुसार नियंत्रित करण्यात येते, अशा दुधाला प्रमाणीकृत दूध असे म्हणतात. भारतात अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा, १९७६ नुसार पिण्यासाठीच्या प्रमाणीकृत दुधात किमान ४.५ टक्के स्निग्धांश आणि ८.५ टक्के घृतांश विरहित पदार्थ (सॉलिड नॉट फॅट) असावेत.

टोण्ड किंवा सिंगल टोण्ड दूध

Toned or Single toned Milk


पूर्ण दुधात स्किम दुधाची पावडर व पाणी मिसळून तयार केलेल्या दुधास टोण्ड दूध असे म्हणतात. भारतातील अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा, १९७६ नुसार अशा दुधात किमान ३ टक्के स्निग्धांश व ८.५ टक्के घृतांश विरहित पदार्थ (सॉलिड नॉट फॅट) असावेत.

डबल टोण्ड दूध-Double Toned Milk


पूर्ण दुधात स्किम दुधाची पावडर व पाणी मिसळून तयार केलेल्या दुधास टोण्ड दूध असे म्हणतात. भारतातील अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा, १९७६ नुसारअशा दुधात किमान १.५ टक्के स्निग्धांश व ९.० टक्के घृतांश विरहित पदार्थ (सॉलिड नॉट फॅट) असावेत.

होमोजिनाईज्ड दूध - Homogenised Milk


ज्या दुधामधील स्निग्धांशाच्या म्हणजेच फॅटच्या कणांचा आकार २ मायक्रॉनपेक्षा कमी करण्यात आलेला आहे आणि असे दूध ४८ तासापर्यंत तसेच ठेवल्यास त्यावर मलईचा थर साचत नाही, अशा दुधास होमोजिनाईज्ड दूध असे म्हणतात.

पुनर्एकत्रित दूध-Whole Milk


या दुधात बटर ऑईल, स्किम दुधाची पावडर व पाणी यांचे योग्य प्रमाणात केलेले मिश्रण असते. भारतातील अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा, १९७६ नुसार अशा दुधात किमान ३ टक्के स्निग्धांश व ८.५ टक्के घृतांश विरहित पदार्थ (सॉलिड नॉट फॅट) असावेत.

पुनर्गठित दूध-


एक भाग पूर्ण दुग्ध पावडर व ७ ते ८ भाग पाण्यात मिसळून तयार केलेल्या दुधास पुनर्गठित दूध असे म्हणतात.

फरमेंटेड दूध- Fermented Milk


ठराविक सुक्ष्मजिवांचा वापर करून तयार केलेल्या विशिष्ट चव व पोत असलेल्या दुधास फरमेंटेड दूध असे म्हणतात.

...........................................

milk-productsखालील फेसबूक, ट्विटर, वॉटस्‌अप इ. आयकॉनवर क्लिक करून हा लेख आपल्या परिचित व्यक्तिंना शेअर करा. तसेच त्याखाली असलेल्या पोस्ट अ कमेंट या ठिकाणी या लेखाबद्दल आपले मत इंग्रजी किंवा मराठीत व्यक्त करा. काही प्रश्न असल्यासही तेथे पोस्ट करा. आपणास प्राप्त झालेली किंवा वरील यूआरएल एड्रेसबार येथील लिंक आपण शेअर करू शकता. असे केल्याने आम्हाला अशाच प्रकारे उत्तम लेख आपल्यासाठी सादर करण्यास प्रेरणा मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या