रांगडा कांदा | Onion

onion
onion

 

रांगडा कांदा | Onion

महाराष्ट्रात कांद्याची लागवड जवळ जवळ वर्षभर होत असली तरी मुख्यत: खरीप हंगाम, रांगडा हंगाम आणि रब्बी हंगाम हे तीन हंगाम प्रचलीत आहे. 


काही भागामध्ये बाजरीसारखे एखादे पिकनिघाल्यानंतर म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये कांद्याची लागवड करतात. त्याला रांगडा कांदा असे म्हणतात. 

 

कांद्याखालील एकूण क्षेत्रापैकी २० टक्के क्षेत्रावर रांगडा कांद्याची लागवड केली जाते. पुणे, नाशिक, नगर आणि धुळे या जिल्ह्‌यात या कांद्याची लागवड केली जाते. यात जुलै महिन्यात बी पेरून रोपांची पुर्नलागण ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात केली जाते. हा कांदा जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात काढणीस तयार होतो. रांगडा हंगामात साधारणपणे पातीच्या वाढीसाठी ७०-८० दिवस लागतात, तर कांदा पोसण्यासाठी ५० ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. या हंगामात रात्रीचे थंड तापमान आणि दिवसाचे उष्ण तापमान यामुळे कांदा चांगला पोसतो. ह्या काळातील उष्ण आणि कोरड्या हवेमुळे कांद्याची काढणी करणे, तो पातीसह सुकविणे, पात कापणे, प्रतवारी करणे आणि सावलीत तो सुकविणे ही कामे सोपी होतात.

या हंगामात प्रति हेक्टरी २५ ते ३० टन उत्पादन मिळते. मात्र रांगडा हंगामात डेंगळे येणे , जोडकांदे तयार होणे याचे प्रमाण जवळपास ३० ते ४० टक्के आढळते, त्यामुळे कांद्याची प्रत खालावते. हे टाळण्यासाठी बसवंत-७८० किंवा ऍग्रीफाऊंड रेड , फुले समर्थ या जातींची निवड करावी. कारण या जातींमध्ये डेंगळे आणि जोडकांदे येण्याची प्रवृत्ती कमी आहे. शिवाय साठवण करावयाची झाल्यास २ ते ३ महिने साठविता येतात.


=====================
हे वाचलंत का?                          


======================
आणखी महत्त्वाचे लेख               


खालील फेसबूक, ट्विटर, वॉटस्‌अप इ. आयकॉनवर क्लिक करून हा लेख आपल्या परिचित व्यक्तिंना शेअर करा. तसेच त्याखाली असलेल्या पोस्ट अ कमेंट या ठिकाणी या लेखाबद्दल आपले मत इंग्रजी किंवा मराठीत व्यक्त करा. काही प्रश्न असल्यासही तेथे पोस्ट करा. आपणास प्राप्त झालेली किंवा वरील यूआरएल एड्रेसबार येथील लिंक आपण शेअर करू शकता. असे केल्याने आम्हाला अशाच प्रकारे उत्तम लेख आपल्यासाठी सादर करण्यास प्रेरणा मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या