दुधातील प्रथिन-केसीन | Milk protein-casein

milk-protein-casein
milk-protein-casein

 

दुधातील प्रथिन-केसीन 

Milk protein-casein

दुधात अनेक प्रकारचे घटक असतात. त्यातील स्निग्धांश Fat, प्रथिने Protein , शर्करा Sugar , खनिजे Minerals , जीवनसत्त्वे Vitamins, पाणी Water हे घटक महत्त्वाचे आहेत. दुधामध्ये जे अनेक उपयुक्त घटक आहेत त्यापैकी केसीन हे महत्त्चाचे प्रथिन आहे. 


दुधातील प्रथिने उत्तम प्रतीचे असून ते भरपूर प्रमाणात असतात. साधारणपणे दूधात ३.५ ते ३.९ इतके प्रथिनांचे प्रमाण असते. दुधातील प्रथिनात ८० टक्के केसीन, १८ टक्के लॅक्टअल्बुमीन आणि २ टक्के लॅक्टो ग्लोबुलीन lactoalbumin and lacto globulin असते. केसीन हा प्रथिनांचा मुख्य भाग आहे. केसीन हे प्रथिन निसर्गात इतरत्र आढळत नाही.

 

केसीनचे महत्त्व- Importance of Casein-

  • दुधाला पांढरेपणा केसीनमुळे येतो. 
  • प्रथिनांमुळे शरीराच्या मांस पेशीच्या वाढीसाठी, मजबूती आणि बांधणीसाठी मदत होते. म्हणूनच आहार शास्त्रीय दृष्ट्या हे परीपूर्ण प्रथिन समजले जाते. 
  • विशेष म्हणजे केसीनचा उपयोग केवळ अन्नघटक म्हणून नाही तर अनेक नित्योपयोगी वस्तू बनविण्यासाठीही करण्यात येतो. 
  • म्हणून दुधापासून केसीन तयार करण्याच्या उद्योगाला जगभर चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


केसीनचेे प्रकार | Types of Casien

सर्वसाधारणपणे केसीनचे औद्योगिक केसीन (ऍसीड केसीन, रेनेट केसीन Acid Casein, Rennet Casein ) आणि खाद्योपयोगी केसीन असे प्रकार पडतात. खरे तर औद्योगिक केसीन सुद्धा खाद्योपयोगी असू शकते फक्त ते तयार करतांना वापरले जाणारे दूध, पाणी, भांडी व इतर यंत्रसामुग्री स्वच्छ आणि निर्जतूंक केलेली असावी. तसेच केसीन तयार करण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही मार्गे शरीरात हानीकारक जिवाणू किंवा रासायनिक पदार्थ त्यामध्ये जाणार नाहीत याची खबरदारी घेतलेली असावी. तरीपण सध्या खाद्य पदार्थात वापरला जाणारा केसीनचा मुख्य प्रकार म्हणजे सोडियम किंवा कॅल्शियम केसीनेट calcium caseinate हा होय.

ऍसीड केसीनचा उपयोग गोंद म्हणून, कागदाला गुळगुळीतपणा आणण्यासाठी, पेपर कोटींग ( Paper Coating ) म्हणून, रंगांमध्ये कृत्रिम धागे बनविण्यासाठी, कपडे व कातडीला चकाकी आणण्यासाठी, कीटकनाशकामध्ये आणि औषधी कारखान्यात केला जातो. रेनेट केसीनचा उपयोग उत्तम दर्जाच्या प्लास्टिकच्या वस्तू बनविण्यासाठी होतो. जपानमधील एका कंपनीने रेशमाच्या धाग्याला प्रतिस्पर्धी असा कृत्रिम धागा केसीन आणि ऍक्रीलो नायट्राइलच्या मिश्रणापासून तयार केला आहे. त्यापासून बनविलेलेे कापड रेशमी कापडाच्या तोडीचे आणि रेशमापेक्षा मजबूत व टिकाऊ आहे. खाद्योपयोगी केसीन हे त्याच्या मूळ रूपात किंवा सोडियम केसीनेट या रूपात अनेक खाद्य पदार्थांमध्ये वापरले जाते. आईस्क्रीम, कॉफी व्हाईटनर ( Cofee Whitener) , कृत्रिम दूध, फेसाळणार्‍या अन्न भुकट्या, झटपट नाश्त्याचे पदार्थ, सॉस ( Sauce) आदींमध्ये खाद्योपयोगी केसीनचा उपयोग होतो.

......................................

( Click here to purchase milk casein from Amazon)

Milk-Casein


खालील फेसबूक, ट्विटर, वॉटस्‌अप इ. आयकॉनवर क्लिक करून हा लेख आपल्या परिचित व्यक्तिंना शेअर करा. तसेच त्याखाली असलेल्या पोस्ट अ कमेंट या ठिकाणी या लेखाबद्दल आपले मत इंग्रजी किंवा मराठीत व्यक्त करा. काही प्रश्न असल्यासही तेथे पोस्ट करा. आपणास प्राप्त झालेली किंवा वरील यूआरएल एड्रेसबार येथील लिंक आपण शेअर करू शकता. असे केल्याने आम्हाला अशाच प्रकारे उत्तम लेख आपल्यासाठी सादर करण्यास प्रेरणा मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या