श्‍वासाद्वारे औषध-नेब्यूलायझर | Inhalation drug-nebulizer

nebulizer
nebulizer

श्‍वासाद्वारे औषध-नेब्यूलायझर 

Inhalation drug-nebulizer

नेब्यूलायझर मशीनमुळे द्रव स्वरूपातील औषधे अत्यंत बारीक कणांच्या स्वरूपात बाहेर सोडली जातात. यामुळे औषध सहजपणे श्‍वासाद्वारे तोंडातून किंवा नाकाला लावलेल्या मास्कद्वारे आत जाते. नेब्यूलायझर दोन प्रकारचे असतात. जेट नेब्यूलायझर आणि अल्ट्रासोनिक नेब्यूलायझर. ( Jet Nebulizer and Ultrasonic Nebulizer. )

नेब्युलायझरची उपयुक्तता

The usefulness of the nebulizer

श्‍वसनासंबधी आजार असणार्‍यांना नेब्यूलायझर वापरण्याचा सल्ला दिला जातो. खरे तर नेब्यूलायझर वापरतांना कोणत्याही प्रकारे भिती बाळगण्याचे कारण नाही. रूग्ण खूप सिरीयस असेल तर नेब्यूलायझर वापरले जाते, हा सुद्धा गैेरसमज आहे. गोळ्या किंवा इतर ओैषधे घेण्यापेक्षा नेब्यूलायझर अधिक परिणाम कारक आहे. कारण श्‍वसनाच्या आजारावर दिलेल्या गोळ्या किंवा इतर औषधे प्रथम पोटात जातात आणि तेथे त्यांच्यावर क्रिया होऊन ती रक्तात मिसळतात आणि नंतर फफ्फुस किंवा संबधित  अवयवाला दुरूस्त करतात. 

नेब्यूलायझरमुळे थेट फुफ्फुसाला  औषध उपलब्ध होत असल्यामुळे ते इतर औषधांच्या तुलनेत जास्त परिणामकारक आहे. 


तसेच नेब्यूलायझर वापरतांना खूप खोल श्‍वास घ्या किंवा विशिष्ट प्रकारे श्‍वास घ्या असे करण्याची अजिबात गरज नसते. सामान्यपणे श्‍वास घेऊनही नेब्यूलायझरचा उपयोग होतो. त्यामुळे ज्यांना गंभीर स्वरूपाचा दमा झालेला आहे अशा लहान मुलांमध्ये आणि वयस्कर माणसांमध्येही ते सहज वापरता येते. 

 

तसेच कृत्रिम श्‍वासोच्छवासाच्या उपकरणाद्वारेही (व्हेंटीलेटर) नेब्यूलायझर वापरता येते. 

विशेष म्हणजे या उपकरणात वापरले जाणारे औषध आत सोडण्यासाठी विशिष्ट कठीण क्रिया करावी लागत नाही आणि यात वापरले जाणारे औषधामुळे तोंडात चिकटपणा किंवा इतर प्रकारे कोणताही त्रास फारसा जाणवत नाही.

 अस्थमाच्या  ( Asthma) ज्या रूग्णांना इतर प्रकारची इनहेलर inhaler, रोटोहेलर - rotohaler किंवा स्प्रे  spray वापरण्यास अडचणी येतात, असे रूग्ण नेब्यूलायझरचा वापर सहजपणे करू शकतात. 

आता तर घरी वापरण्यासाठी छोट्या स्वरूपात नेब्यूलायझर बाजारात उपलब्ध झाले आहेत. म्हणून त्यासाठी खास रूग्णालयात जायची गरज भासत नाही. 

नेब्यूलायझर वापरण्यासाठी खरे तर विजेची गरज भासते. मात्र आता बॅटरीवर चालणारी नवीन अत्याधुनिक असे नेब्यूलायझरचे काही प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत.

..........................................................

( Click image to purchase Nebulizer from Amazon)

Amazon-nebulizer
Amazon-nebulizer


खालील फेसबूक, ट्विटर, वॉटस्‌अप इ. आयकॉनवर क्लिक करून हा लेख आपल्या परिचित व्यक्तिंना शेअर करा. तसेच त्याखाली असलेल्या पोस्ट अ कमेंट या ठिकाणी या लेखाबद्दल आपले मत इंग्रजी किंवा मराठीत व्यक्त करा. काही प्रश्‍न असल्यासही तेथे पोस्ट करा. आपणास प्राप्त झालेली किंवा वरील यूआरएल एड्रेसबार येथील लिंक आपण शेअर करू शकता. असे केल्याने आम्हाला अशाच प्रकारे उत्तम लेख आपल्यासाठी सादर करण्यास प्रेरणा मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या